ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता प्रतिज्ञा.
(श्रीराम कांदु )
ठाणे:दि.३ आज जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली.
आम्ही भारताचे लोकसेवक आमच्या कार्यक्षेत्रात भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी दक्ष राहून आमच्या संघटनेच्या वृद्धीसाठी व लौकिकासाठी कार्य करू तसे आम्ही आमचे कर्तव्य निष्ठापुर्वक पार पाडू अशी प्रतिज्ञा अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचर्याना दिली.
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) जीवन गलांडे ,तहसीलदार श्रीमती आसावरी संसारे,आदी उपस्थित होते
Please follow and like us: