ठाणेकर विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ म्हणजे दादा कोंडकेंना वाहिलेली मानवंदना

सिनेमाचं बोल्ड पोस्टर आणि त्यापाठोपाठ रिलीज केलेला बोल्ड टीजर आणि ट्रेलर यामुळे शिकारी सिनेमा गेल्या काही दिवसांत चांगलाच चर्चेत राहिला. सिनेमाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस राहिले असल्याने सिनेमाची स्टार कास्ट आणि तांत्रिक टीम सिनेमाच्या प्रमोशनसाठी राज्यभर फिरताना दिसत आहे. एक विनोदी आणि संपूर्णतः व्यावसायिक चित्रपट असलेला शिकारी हा सिनेमा म्हणजे विनोदाचे बादशाह दादा कोंडके यांना आम्ही वाहिलेली ती एक मानवंदना असल्याचे सिनेमाचे प्रस्तुतकर्ते महेश वामन मांजरेकर यांचं म्हणणं आहे. स्ट्रगलर साला फेम आणि ठाणेकर असलेल्या दिग्दर्शक विजू मानेने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंटचे विजय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर आनंद वैद्यनाथन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. २० एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रसिद्ध होणार आहे.
शिकारी सिनेमा त्याच्या बोल्ड प्रेझेन्टेशनमुळे सतत चर्चेत राहिला असून याची तगडी स्टारकास्ट हे देखील याचे प्रसिद्धीचे महत्वाचे कारण ठरले आहे. सुव्रत जोशी आणि साऊथची अभिनेत्री नेहा खान, या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. त्यांच्याबरोबर कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यामध्ये आहेत.
अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. या चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा दांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email