ट्रेकिंगला गेलेल्या युवकाचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने मृत्यू

पनवेल – ट्रेकिंगला गेलेल्या २७ वर्षीय युवकाचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना पनवेल येथे घडली आहे.सदर मृत तरुणाचे नाव चेतन असे असून तो पुण्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन धांडे (२७) हा युवक आपल्या मित्रांबरोबर पनवेल येथील प्रबळगड येथे फिरण्यासाठी आला होता.येथे ट्रेकिंग करत असताना त्याचा पाय घसरून तो सुमारे हजार फुट खोल दरीत कोसळला.मित्रांनी त्याचा शोध घेताला असता तो त्यांना मृत झालेला सापडला.याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात् मृत्यूची नोंद केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email