ट्रक च्या धडकेत महिलेचा मृत्यु
कल्याण दि.०५ – कल्याण पूर्व नेतीवली येथील शिव सह्याद्री नगर येथे राहणाऱ्या सलीमा शेख ५५ ही महिला नेतीवली चौक येथून पायी चालत जात असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने त्यांना धडक दिली या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us: