टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व पिवळ्या पट्टीबाबत निर्णय घेण्याबाबत तज्ज्ञांच्या समितीची स्थापना – एकनाथ शिंदे
नागपूर, दि.१४ – राज्यातील टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिवळ्या पट्टीबाबत निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एप्रिल 2018 मध्ये तज्ज्ञ समिती स्थापन केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी कालच्या विधानपरिषदेत दिली.
सदस्य संजय दत्त यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. शिंदे म्हणाले, या समितीची पहिली बैठक 25 एप्रिल 2018 रोजी झाली आहे. बैठकीमध्ये आयआयटी मुंबई यांचे तज्ज्ञ व्यापक अभ्यास करुन सहा महिन्यांत अहवाल सादर करतील. त्यानंतर निविदेतील तरतुदीस अधिन राहून, कायदेतज्ज्ञ आपले अभिप्राय देतील, असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली.
या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य श्रीमती विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.
Please follow and like us: