टोलेजंग इमारत होणार जमीनदोस्त डोंबिवलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत समावेश असलेल्या “ई” प्रभागातील प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी पालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार देसले पाडा, गजानन चौक, नांदिवली डोंबिवली पूर्व येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
भांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन चौक येथील तळमजला अधिक पाच मजले बांधकाम असलेली टोलेजंग इमारत साबळे यांच्या मालकीची होती. इमारत तळमजला अधिक पाच मजले असे बांधकाम असून ती अनधिकृत असल्याने  कारवाई करण्यात आली  आज या इमारतीवर कारवाई करण्यात येत असून इमारत तोडण्याचे काम सुरु आहे. या कारवाईसाठी ५० पोलीस कर्मचारी, ५० कामगार, दोन जेसीपी, दोन पोखलन, कटर असा फोजफाटा आणण्यात आला होता.संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात येणार आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email