`टॉप टेन`स्थानकाच्या यादीत दुसरा क्रमांक असलेल्या डोंबिवली स्थानकात सुविधांचा ‘दुष्काळ ‘
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१८ – मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे,उत्पन्न देणार्या टॉप टेन ‘स्थानकांच्या यादीत ठाणे स्थानकाचा प्रथम तर डोंबिवली स्थानकाचा दुसरा क्रमांक लागतो, मात्र ठाणे रेल्वे स्थानकावर ज्या प्रमाणे रेल्वे प्रशासनाने सुविधा दिल्या आहेत त्या प्रमाणे डोंबिवली स्थानकाकडे कमालीचे दुर्लक्ष करण्यात येत आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकाचे उत्पन्न वाढले मात्र सुविधा पुरवण्यात रेल्वे प्रशासनाचा दुष्काळ आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डोंबिवली रेल्वे स्थानकातून रोज सुमारे अडीच लाख प्रवासी प्रवास करतात रोजचे उत्पन्न सुमारे १७ लाख रुपये आहे. असे असले तरी तिकीट खिडक्या वाढवणे, प्रसाधन गृह व एटीव्हीएम वाढवणे याशिवाय प्रशासन महत्वाच्या सुविधा देण्यास टाळाटाळ करत आहे व दुर्लक्ष करत आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी डोंबिवली लोकल वाढवणे तातडीने आवश्यक आहे मात्र रेल्वे प्रशासन रॅक नाही असे सांगून ते टाळत आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकावरील गर्दीचा ताण दिवसे दिवस असहय होत आहे कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली परिसरात टोलेजंग इमारती उभ्या रहात असून भविष्यात या भागात मोठया प्रमाणात लोकवस्ती वाढणार आहे. म्हणून ठाकुर्ली टर्मिनस उभारावे व तेथून लोकल सेाडाव्यात अशी मागणी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे पण प्रशासन अजून निर्णय घेत नाही. ठाकुर्ली येथून उपनगरी लोकल सेाडल्या तर डोंबिवलीकरांचा त्रास कमी होणार असून यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज अडीच लाख प्रवासी करतात प्रवास ….
डोंबिवली स्थानकावरुन रोज सुमारे अडीच लाख प्रवासी प्रवास करत असले तरी स्थानकावर तुटपुंज्या प्राथमिक सुविधा आहेत. महिला व पुरुषांसाठी अवघी चार -चार स्वच्छतागृहे असून त्याची अवस्था वाईट आहे. तर अपंगांसाठी दोन स्वच्छतागृहे असून पिण्याच्या पाण्याची बांब आहे.