टैंकर गैस लिकीज झाल्याने घबराट,शहापूर ब्रेकिंग
(म विजय )
*मुंबई -नाशिक महामार्गावर चेरलोपी येथे सकाळी 6 वाजता गॅस चा टँकर पलटी झाल्याने 1 तास महामार्गावरील वाहतूक पूर्ण बंद
करण्यात आली होती
महामार्गलगत बिल्डिंग असलेल्या लोकांना सावधगिरी म्हणून पोलिसांनी बिल्डिंग बाहेर निघायला सांगितले होते
वेळ सकाळी 6 वाजता ची मुंबई – नाशिक महामार्गावर कांबरे फाटा येथे धुराचे लोट पसरलेले दिसंत होते, अगोदर काही समजलं नाही परंतु सदर धूर हा गॅस चा टँकर पलटी झाल्यामुळे पसरला असल्याचे समजताच जवळच परांजपे नगर येथे राहणारे शहापूर चे आमदार पांडुरंग बरोरा यांनी प्रसंगावधान दाखवून तातडीने घटनास्थळी धाव घेतली संपूर्ण परिस्थिती पाहिली व तातडीने शहापुर पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी शहापूर, यांना फोन केले तसेच महामार्ग पोलिसांच्या सोबत उभेराहून त्यांना मदत केली, सदर ठिकाणी 2 गाड्यांचा अपघात झाल्या मुळे जखमी ड्रायव्हर व क्लिनर यांना हॉस्पिटल मध्ये पाठविण्या साठी रुग्णवाहिका बोलवली, तसेच परिसरातील इमारती मधील रहिवाश्यांना इमारती बाहेर काढण्यासाठी फोन केले