टेम्पोची बेरिगेट्सला जोरदार धडक
कल्याण दि.२४ – कल्याण मधील ब्रिटिश कालीन पत्रिपूल धोकादायक झाल्याने या पुलावरील जड अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या पुलावरून दुचाकी चार चारचाकी गाड्यांची वाहतूक सुरू होती. अवजड वाहनांनी पत्री पुलावर प्रवेश करू नये म्हणून या पुलाच्या सुरुवातीलाच हाय बेरिगेट्स बसवन्यात आले होते. मात्र पुलाशेजारी वाहतूक नियमन तसेच अवजड वाहनाची वाहतूक नवीन पुलावर वळवण्यासाठी वाहतुक पोलीस मनोज वाघ व ट्राफिक वार्डन कार्यरत असताना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने बेरिगेट्सला जोरदार धडक दिली त्यामुळे बेरिगेट्स खाली कोसळले. या प्रकरणी कोलशेवाडी वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी मनोज वाघ यांनी सबंधित टेम्पो चालका विरोधात कोल्शेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सचिन श्रावण यांन टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.