टॅक्सच्या भीतीने इतक्यात कोणीही आपले शेअर्स विकण्याची घाई नको
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – केंद्र सरकारने अजून दिर्घ मुदतीच्या लाभासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही आपल्याला टॅक्स भरावा लागेल या भीतीने नागरिकांनी आपले शेअर्स गुंतवू नये असा सल्ला अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी दिला
शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना मध्यवर्ती शाखेने काल संध्याकाळी आदित्य मंगल कार्यालयात ‘अर्थ संकल्प व गुंतवणूक संधी ‘या विषयावर ते बोलत होते .
टिळक म्हणाले केंद्र सरकारने लॉंग टर्म केपीटल गेन टॅक्सची आकारणी कशी करायची याचा निर्णय घेतला नाही हे लक्षात घेऊन केवळ टॅक्स भरावा लागेल म्हणून आपले शेअर्स विकण्याची घाई करू नये असा मोलाचा सल्ला दिला व्याख्यानाला मोठी गर्दी झाली होती विजय देशमुख यांनी सुत्रसंचलन केले.
Please follow and like us: