टीएमटी बसने पेट घेतला : प्रवासी वेळीच उतरल्याने जीवितहानी टळली
ठाणे -बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ठाणे परिवहन सेवेच्या बसने अचानक पेट घेतला.बसमधील प्रवासी वेळीच उतरल्याने मोठी दुर्घटना टळली.
चेंदणी कोळीवाडा ते खिडकाळी यामार्गावारील ठाणे परिवहन सेवेच्या बसने रेतीबंदर परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास अचानक पेट घेतला.बसमधील प्रवासी वेळीच उतरल्याने जीवितहानी टळली.आगिचं कारण अद्द्याप समजले नसून बसमधील अंतर्गत भाग या आगीत जळुन खाक झाला.