टांगा चालकाचा बांधलेला घोडा चोरीला

श्रीराम कांदु 

कल्याण- कल्याण शहरात एका टांगा चालकाचा घोडा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कल्याण पूर्व नेतिवली येथील होमबाबा टेकडी येथे राहणारे हुसेन जाफर खान हे टांगा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. सायंकाळी ४ च्या सुमारास हुसेन यांनी नेहमीप्रमाणे आपला घोडा घराच्या परिसरात बांधला व ते घरी निघून गेले.दुसा-या दिवशी सकाळी घोडा चोरीला गेल्याचे त्यांना आढळुन आले. त्यानंतर हुसेन यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदविली. घोडा बांधून ते घरी गेल्यानंतर बाबू नावाच्या एका इसमाने संधी साधून घोडा चोरून नेला असा आरोपही त्यांनी केला आहे.यानुसार पोलिसांनी फरारी बाबूचा शोध सुरू केला आहे

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email