ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी १५ कोटीची तरतूद मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

(म.विजय)

नागपूर दि.०५ – ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी राज्य सरकारने पुरवणी मागण्यात १५ कोटी रुपयांची तरतूद केली. या निर्णयामुळे जेष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळणार आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ आणि राज्यातील पत्रकार संघटना या योजनेची मागणी करीत होते. ही मागणी पूर्ण झाल्याबद्दल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानमंडळात पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.

पत्रकार सन्मान योजनेसाठी योजनपुरवणी मागण्यात १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ सातत्याने या योजनेसाठी पाठपुरावा करीत होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या राजभवनावर झालेल्या १० जानेवारी २०१८ रोजीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात याच वर्षी पेन्शन लागू करण्याची घोषणा केली होती. त्यांनी या आश्वासनाची पूर्तता केली. आता या योजनेची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाने व्यक्त केली. यावेळी वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य व संघाचे जेष्ठ सदस्य उपस्थित होते. या निर्णयाबद्दल या मागणीसाठी प्रयत्न करणाऱ्या पत्रकार संघटना आणि पत्रकारांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ अभिनंदन करीत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email