ज्येष्ठ गायिका व शिक्षिका डॉ सुचिता बिडकर यांचे वृद्धापकाळाने निधन

डोंबिवली दि.१९ – स.वा. जोशी शाळेच्या शिक्षीका डॉ. सुचेता बिडकर यांचं काल  वयाच्या  ८३ व्या वर्षी  राहत्या घरी  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या जेष्ठ शास्त्रीय गायक तथा व्हायोलिन वादक पं. गजाननराव जोशी यांची जेष्ठ कन्या आणि जेष्ठगायक तथा व्हायोलिनवादक  पं. मधुकर जोशी यांची थोरली बहीण होत्या. डॉ सुचेता बिडकर ह्या महिला  विद्यापीठ, पुणे येथे  संगीत विभाग प्रमुख म्हणून सेवेत राहिल्या होत्या. “पुत्र व्हावा ऐसा” ह्या पं गजाननराव जोशी यांच्या चरित्राचे लेखन त्यांनी केले आहे.

तसेच “मधु मालती” या  त्यांच्या बंदिश संग्रहाचे काही वर्षांपूर्वी प्रकाशन झाले, ह्यात  अनेक बंदिशी चा संग्रह त्यांनी शास्त्रीय गायकांसाठी करून ठेवला. गायकाच्या घरात जन्म घेतलेल्या मालती जोशी यांनी जयपूर ग्वाल्हेर आग्रा ह्या घराण्याच्या गायकीचा वसा पुढे सुरूच ठेवला होता त्यांची गाण्याची तालीम वडील गजानन राव जोशी आणि आजोबा  अनंत मनोहर जोशी (अंतु बुवा)यांच्याकडे झाली त्यामुळे घराणेदार गायकी घरातच असल्यामुळें गुरुकुल पद्धतीनेच इतर शिष्यांप्रमाणे त्यांचा  प्रवास सुरू राहिला.मालू ताई या नावाने त्या सर्व शिष्य परिवारात संबोधले जात .हाच वसा त्यांनी सुरू ठेवत अनेक शिष्य घडवले आणि आपल्या लेखणीतून  मार्गदर्शन केले काल संध्याकाळी त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published.