जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात गुप्तगू .
(म विजय )
नगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राळेगणसिद्धी येथे बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेपासून पालकमंत्री राम शिंदेंपासून सर्वच पुढारी व कार्यकर्त्यांना दूर ठेवण्यात आले होते.
या चर्चेत अण्णा हजारे यांच्या जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात होणाऱ्या आंदोलनाविषयी चर्चा झाल्याची शंका असून, अण्णा हजारे यांनी मोदी सरकारच्याविरोधात लोकपाल व लोकायुक्तच्या नियुक्तीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.याबाबत केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करण्यास सांगितले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी राळेगणचा दौरा करून अण्णा हजारे यांच्याबरोबर बंद खोली चर्चा केली. मात्र, या चर्चेपासून हजारे यांच्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री राम शिंदे ,ऊर्जामंत्री बावनकुळे व पुढाऱ्यांना दूर ठेवण्यात आल्याने या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नसले तरी अण्णा हजारे यांच्या आगामी आंदोलनाविषयी चर्चा झाल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजारे यांचे आंदोलनापासून मन वळवण्याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
मोदींपेक्षा देवेंद्र बरे, तरीही आंदोलन होणार: अण्णा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आहेत. मात्र, आज मुख्यमंत्री राळेगणसिद्धीत आले याचा अर्थ आपण लोकपालच्या आंदोलनावरून मागे हटणार असा होत नसल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले. लोकपाल कायद्यासाठी दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीत आंदोलन होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले