जेम सिम्थेटिक अॅड पॉलीमर इंडिया कंपनीत वेल्डिंग करताना आग – डोंबिवलीतील घटना

डोंबिवली दि.१५ – एमआयडीसी फेस – १ येथील जेम सिम्थेटिक अॅड पॉलीमर इंडिया या बंद कंपनीत वेल्डिंग काम सुरु असताना आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. अग्निशमन दलाने वेळेत आग आटोक्यात आणली .

फेब्रीकेशन कटिंगचे काम सुरु होते. त्याठिकाणी जुन्या टाकीत ( जळलेले इंधन ) वेल्डिंग ठिणगी उडाल्याने आग लागली होती. याची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान आले. या कंपनीच्या बाजूला सीएनजी पेट्रोलपंप असल्याने काही वेळ पेट्रोलपंप बंद करण्यात आला होता.वेळीच अग्निशमक दलाने आग नियंत्रणात आणली नसती तर मोठी दुर्घटना घडली असली. सुदैवाने यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. अशी माहिती अग्निशमन दलाच्या डोंबिवली विभागाचे अधिकारी सुरेश शिंदे यांनी दिली

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email