जुन्या वादातून मारहाण
डोंबिवली – कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी जीम्मिबाग शेलार भवन येथे राहणारा विकास बनसोडे मंगळवारी सायंकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुंरास म्हसोबा चौकात चहाच्या टपरी जवळ चहा पीत होता यावेळी नागेश दळवी ,आकाश ,संदीप हे तिघे जन त्या ठिकाणी आले .पूर्वी झालेल्या भांडनाच राग मनात धरून नागेशने विकासच्या कपाळावर चाकूने वार केला तर आकाश आणि संदीप ने विकास ला लोखंडी रोड ने बेदम मारहाण केली .या मारहाणीत विकास जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी नागेश दळवी ,आकाश ,संदीप या तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .