जुन्या भांडणाच्या रागातून दोन भावांना मारहाण – डोंबिवलीतील घटना
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०३ – डोंबिवली पुर्वेकडील दावडी गावातील विश्वकर्मा चाळीत राहणारे दिलीपकुमार यादव यांचे दोन महिन्यांपूर्वी शिवप्रकाश यादव ,संतोष कुमार यादव ,महेश कुमार यादव ,शिवलाल यादव यांच्याशी भांडण झाले होते. दिलीपकुमार शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुर्वेकडील सुयोग हॉल नजीक आपल्या भावाशी बोलत उभे असताना दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शिवप्रकाश यादव ,संतोष कुमार यादव ,महेश कुमार यादव ,शिवलाल यादव हे चौघे तेथे आले. त्यांनी दिलीपकुमार सह त्यांचा भाऊ रिंकू याला शिवीगाळ करत लाकडी दंडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात अली असून या तक्रारी नुसार पोलिसानी शिवप्रकाश यादव ,संतोष कुमार यादव,महेश कुमार यादव ,शिवलाल यादव विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.