जुनी डोंबिवली रस्त्याच्या चाळणीमुळे वाहतूक कोंडी

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिका “ह” प्रभाग क्षेत्रातील जुनी डोंबिवली शास्त्रीनगर विभागाकडे महापालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले आहे. जुनी डोंबिवली संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली असून धुळीच्या लोटाने  नागरिकाने आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याची चाळण झाल्यामुळे जुनी डोंबिवली विभागात वाहतूक कोंडी होत आहे.
पश्चिमकडील द्वारका हॉटेल शेजारी असणाऱ्या चौकापासून ते देवी चौक दरम्यान रस्त्यांची अवस्था फारच चिंताजन आहे. रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या भूमिगत गटारांच्या दुरुस्तीचे काम गेले दोन महिने सुरु होते. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करणे महापालिका अधिकाऱ्यांना गरजेचे वाटत नाही. विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजूला रोड लाईटसाठी टाकण्यात येणाऱ्या केबलसाठी खोदण्यात आले. परंतु तेही काम अर्धवट अवस्थेत आहे. परिणामी रस्ता खोद्ल्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. जुनी डोंबिवली विभागातील रिक्षा चालकांनी या गोष्टीची तक्रार महापालिका कार्यालयात केली असून त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. पूर्वीही पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे स्वतः रिक्षा चालकांनी श्रमदान करून खड्डे बुजविण्याचे काम केले होते. सदर रस्त्याच्या क्षेत्रात तीन नगरसेविकांचा प्रभाग जोडला असून नगरसेविकाही लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे. डोंबिवलीत चांगले रस्ते होण्यासाठी सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांचे धोरण आखले जात असून मात्र जुनी डोंबिवली रस्त्याकडे महापालिका प्रशासन पाठ का दाखवते याचे कोडे येथील करदात्या नागरिकांना पडत आहे. गेली दोन महिने रस्त्याच्या चाळणीमुळे उडणाऱ्या धुळीच्या लोटामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.धुळीमुळे नागरिकांना सर्दी ,खोकला ,डोकेदुखी आदी विकाराने त्रस्त आहेत.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email