जिल्ह्यातील गरीब,आदिवासी मुलांसाठी सुरु केलेल्या कौशल्य विकास केंद्रातील १४० मुलांना नोकऱ्या
(श्रीराम कांदु)
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप
ठाणे दि १६: वर्षभरापूर्वी गावदेवी मैदान येथील मंडईच्या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या कौशल्य विकास केंद्रातील पहिल्या फळीतील १८१ पैकी १४० जणांना नोकऱ्या मिळाल्याने या आर्थिकदृष्ट्या मागस विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काल जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते या प्रातिनिधिक स्वरूपात मुलांना प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले. नोकऱ्या मिळालेल्या मुलांमध्ये शहापूर, मुरबाड, भिवंडी या भागातील आदिवासी मुले देखील आहेत. उर्वरित ४१ मुलांना नोकरी मिळण्याची प्रक्रिया सुरु आहे
इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ६० मुलांना एलएंडटी,युरेका फोर्ब्स, सॅमकॉन, सीआयआय; ब्युटीशियन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मुलीना ब्युटी बे, झोरो, पर्ल्स स्पा एंड सलून, फेअर ब्युटी केअर इत्यादी सलून्समध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. नर्सिंग अभ्यासक्रम केलेल्या मुलामुलींना जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ भगत हॉस्पिटल, डॉ बेडेकर हॉस्पिटल, मेट्रो हॉस्पिटल, ठाणे मेडिकल असोसिएशन याठिकाणी नोकऱ्या मिळाल्या आहेत. मेकॅनिकल ड्राफ्टसमनच्या २५ विद्यार्थ्यांना अंबरनाथ मॅन्यु.असोसिएशन तर संगणक आणि आयटीचा अभ्यासक्रम केलेल्या २९ विद्यार्थ्यांना डीआयसी तसेच इतरत्र नोकऱ्या मिळाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, फादर ऍ़ग्नेल संस्थेतर्फे कोर्सेस
ठाण्यातील गावदेवी मैदान आणि कल्याण येथील केंद्रांमध्ये अनुक्रमे फादर ऍ़ग्नेल आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे कौशल्य विकासासाठी एकूण बाराप्रकारचे विविध कोर्सेस शिकविण्यात येतात. या केंद्राच्या माध्यमातून आठवी ते बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रीशिअन, मॅकॅनिकल ड्राफ्ट्समन विथ ऑटोकॅड, कॉम्प्युटर हार्डवेअर ऍ़ण्ड नेटवर्कींग, इर्न्फोमेशन टेक्नॉलॉजी, नर्सिंग असिस्टंट, प्रोफेशनल ब्युटीफिकेशन असे 6 प्रकारचे कोर्सेस सध्या सुरु करण्यातआलेले आहेत. या कोर्सेसच्या अभ्यासक्रमास महाराष्ट्र स्टेट स्कील डेव्हलपमेंट सोसायटीकडून मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच फॅशन डिझायनिंग, फिटर,प्लंबिंग, हाऊस किपिंग, रेफ्रिजरेशन ऍ़ण्ड एअर कंडीशनिंग मॅकॅनिक हे कोर्सेस एप्रिल 2017 पासून सुरु करण्यात येणार आहेत. ठाणे जिल्हा कौशल्यविकास केंद्रामध्ये पहिल्या तुकडीत 181 विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते आता दुसरी नवी तुकडी जानेवारी २०१८ पासून सुरु होणार आहे.
असे सुरु झाले कौशल्य विकास केंद्र
राज्याच्या मानव विकास अहवालानुसार ठाणे जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक (HDI) 0.800 इतका आहे. मानव विकास अहवालानुसार मुंबई व पुणे खालोखाल ठाणे जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक लागत असला तरी ठाणे जिल्ह्यातील मूरबाड व शहापूर या दोन तालुक्यांचा मानव अतिमागास 125तालुक्यांमध्ये समावेश होतो.
जिल्ह्यात नागरी भाग मोठ्या प्रमाणावर असला तरी, मुख्यालयापासून 60 ते 70 कि.मी. अंतरावर आदिवासी भागही आहे. तेव्हा, तुलनेने आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणे हा नियोजनाचा मुख्य गाभा ठेवण्यात आला.
बेरोजगारी आणि प्रामुख्याने याला कारणीभूत असलेला युवकांमधील तंत्र कौशल्याचा अभाव यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष्य केंद्रित करण्याचे ठरविले.
आज मुरबाड, शहापूर, भिवंडी भागातील शिक्षित तरुण देखील कामगारांची अर्ध कुशल किंवा श्रमाची कामे करतांना दिसतो. विशेषत: बांधकाम कंत्राटदार,मोबाईल कंपन्यांकडील श्रमिक कामे, जलवाहिन्या किंवा रस्त्याच्या कामांसाठी खड्डे खोदणे अशा कामांवर हे युवक जातात. या भागात पावसाळ्यातील भात शेतीचा अपवाद वगळता उर्वरित हंगामात इतर कुठलीही शेतीची कामे नसतात, अशा वेळी हा मोठ्या प्रमाणावर असलेला युवक वर्ग आणि त्यांची शक्ती निरुद्देश कामासाठी व्यर्थ ठरते आणि अकार्यक्षम कामासाठी वापरली गेल्याने जिल्ह्याच्या उत्पादनात काही भर पाडत नाही हे लक्षात घेऊन या “ ठाणे कुशल” या नावाखाली अभिनव अशा कौशल्य विकास केंद्राची निर्मिती करण्याचे ठरले.
तरुणांना व्यवसायाभिमुख करण्याचे उद्दिष्ट्य
ठाणे हे मुंबईलगतचे मोठे औद्योगिक शहर असून याठिकाणी माहिती तंत्रज्ञानापासून अभियांत्रिकी, उत्पादन आणि लहान मोठ्या औद्योगिक संस्था आहेत. त्यांना लागणार्या आवश्यक मनुष्यबळाची मागणी कौशल्य विकास केंद्रे पूर्ण करु शकतात. जिल्ह्यातील सातही तालुक्यात विशेषत: शहापूर, मुरबाड, भिवंडी भागात तरुणांना व्यवसायाभिमुख बनविणे तसेच विविध कौशल्यात पारंगत करण्यासाठी काही खाजगी संस्थांमार्फत चालविली जाणारी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे आहेत. मात्र शासनाचे असे एकही केंद्र नाही हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी पुढाकार घेऊन हे केंद्र सुरु केले.
सॉफ्ट स्किल्समध्येही पारंगत करणार
या केंद्रात विविध बाबतीत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देतांना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने सॉफ्ट स्किल्समध्येही त्यांना पारंगत करण्यात येत आहे. विशेषत: व्यक्तिमत्व विकास, मुलाखतींसाठी तंत्रे, भाषा याशिवाय शिष्टाचार, सभ्याचार व रितीभाती याचेही तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील काही अधिकारीही वेळ काढून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
महानगरपालिकेचे सहकार्य
केंद्रशासनाच्या राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्हयातील प्रकल्पग्रस्त, आदिवासी व बेरोजगार युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य विकासप्रशिक्षण देणे व रोजगार/ स्वयंरोजगारक्षम बनविणे यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राची