जिल्हा प्रशासनाचे  स्पष्टीकरण ईव्हीएम मशीनमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड नाही

ठाणे दि २१: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भिवंडी तालुक्यात ईव्हीएम मशीनमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड अथवा त्यामध्ये फेरफार करण्यात आलेला नाही असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आज काही वृत्तपत्रांत यासंदर्भात प्रसिध्द झालेल्या बातम्या चुकीच्या असून वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे :

 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भिवंडी तालुक्यात निवडणूक विभाग – 38शेलार अंतर्गत निर्वाचन गण क्रमांक 75 शेलार मध्ये 6 मतदान केंद्र  (मतदान केंद्र क्रमांक38/1, 38/2, 38/3, 38/4, 38/5, 38/6) व निर्वाचण गण क्रमांक 76 कोलीवली मध्ये 6मतदान केंद्र (मतदान केंद्र क्रमांक 38/7, 38/8, 38/9, 38/10, 38/11, 38/12) मिळून एकूण 12 मतदान केंद्रे समाविष्ट आहेत.

यातील केंद्र क्रमांक 38/6 या मतदान केंद्रावर दुपारी 2:00 वाजेपर्यंत मतदान सुरु होते.यावेळेस अॅड चन्ने यांनी सदरचे मतदान केंद्र38/6 हे ७६ कोलीवली गणात समाविष्ट असतांना सदर केंद्रावर ७५ शेलार गणाचे मतदान सुरु असल्याचे निदर्शनास आणले.

याबाबत चौकशी केली असता सदर मतदान केंद्र हे ७६ कोलीवली गणात समाविष्ट करणे आवश्यक असतांना अनवधनाने ते ७५ शेलार गणात समाविष्ट झाल्याचे लक्षात आले.

त्यामुळे या  मतदान केंद्र क्र. 38/6 वरील झालेले मतदान रद्द करून 75-शेलार निर्वाचण गणासाठी  फेरमतदान घेण्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगास सादर केला मात्र कुठल्याही प्रकारे महसूल यंत्रणेमार्फत ईव्हीएम मशीनमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड अथवा त्यामध्ये फेरफार करण्यात आलेला नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email