जिल्हा परिषद् शाळेतील विद्यार्थिनींना मिळणार ५ रुपयात ८ सॅनेटरी नॅपकिन
एम् विजय
मुंबई- ११ ते १९ वयोगटातील जिल्हा परिषद् शाळेतील विद्यार्थिनींना केवळ ५ रुपयात ८ सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकित घेण्यात आला आहे.सदर सॅनेटरी नॅपकिन महिला बचत गटाच्या माध्यमातून पुरवण्यात येणार असून ८ सॅनेटरी नॅपकिनच्या या पाकिटाची किंमत २४ रुपये असेल परंतु जिल्हा परिषद् शाळेतील विद्यार्थिनींना यावर सरकार १९ रुपयांची सबसीडी देणार आहे.महिन्यातून एकदा हे पाकिट विद्यार्थिनिना देण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थिनिना स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे.मासिक पाळीच्या काळात योग्य ती काळजी न घेतल्याने मुलींमध्ये प्रजनानाशी निगडित अनेक समस्या निर्माण होत असल्याचे ग्रामीण भागात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे.त्याच प्रमाणे मासिक पाळीच्या काळात मुली शाळेत अनुपस्थित असतात.हे टाळण्यासाठी विद्यार्थिनींना केवळ ५ रुपयात ८ सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकित घेण्यात आला आहे