जिल्हा परिषदेवर मित्र पक्षांसोबत शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही – पालकमंत्री एकनाथ शिंदे

(म विजय)

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोन गावात आयोजित केलेल्या जाहीर सभेत व्यक्त केली आहे . शिवसेनेच्या पालक मंत्र्यांनी जाहीर सभेत अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . या जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधी भूमिकेत असलेल्या भाजपवर जोरदार हल्ला केला . या जाहीर सभेत भिवंडी पूर्वचे आमदार रुपेश म्हात्रे यांनी थेट भाजप खासदार कपिल पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवत खासदार कपिल पाटील हे कोणत्याही कामांचे श्रेय घेण्याचे काम करतात त्यामुळे खासदारांची नेमकी कामे काय आहेत याचा अभ्यास कपिल पाटील यांनी करावा अशी टीका वजा सूचना आमदार रुपेश म्हात्रे यांनी खासदार कपिल पाटील यांच्यावर केली . या जाहीर सभेत शिवसेनेच्या जैष्ठ  नेते पदाधिकाऱ्यांसह कोन गावातील महिला नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असून सेना भाजपसह मित्र पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे . भाजपकडून प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना प्रचारासाठी निवडणूक रिंगणात उतरवले तर शिवसेनेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर या निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे . जिल्हा परिषदेच्या कोन गटातून शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) हे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत . त्यांच्यासोबत पंचायत समितीसाठी कोन गणातून शिवसेनेच्या उमेदवार शिला नंदकुमार राखाडे या निवडणूक लढवीत आहेत . जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेने सोबत काँग्रेस , राष्ट्रवादी , आरपीआय सेक्युलर अशी महायुती झाली आहे . शिवसेने सोबत असलेल्या मित्र पक्षांच्या प्रचारासाठी रविवारी कोनगावात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते . या सभेत पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसह भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवत खासदार कपिल पाटील हे जिल्हा नियोजन समिती तसेच एमएमआरडीएच्या कामांचे श्रेय घेण्याचे काम करीत आहेत . विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष आपण स्वतः असतांना माझ्या सहीने जिल्ह्यातील अनेक विकास कामांना मंजुरी दिली जाते तसेच एमएमआरडीए कडून कामे हि राज्य पातळीवर होत असतात आमदारांच्या प्रयत्नांनी एमएमआरडीए कडून विकास कामे मंजूर करून घेतली जातात मात्र खासदार कपिल पाटील या कामांचेही श्रेय घेण्यासाठी ब्यानर बाजी करतात आणि या कामांचा श्रेय घेतात . तसेच भाजप विरोधी प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोट्या पोलीस कंप्लेंट करण्याचे काम कपिल पाटील यांच्याकडून होत आहे अशी जहरी टीका देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली . त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच शिवसेने सोबत मित्र पक्ष एकत्र आले आहे अशी प्रतिक्रिया देत रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या प्रचार सभेदारम्यान भाजपला हरवण्यासाठी अभद्र युती होत आहे या व्यक्तव्याला उत्तर दिले. या सभेदरम्यान कोनगावातील भाजपचे तसेच राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला . त्यामुळे कोन गटात शिवसेनेची ताकद वाढली असून भाजपला कोन गटात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.