जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची  पहिली  स्थायी समिती सभा संपन्न

 ठाणे – ठाणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली स्थायी समिती सभा मंगळवार 13 मार्च 2018 रोजी जि.प.अध्यक्ष तथा सभापती स्थायी समिती मंजुषा  जाधव यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली. यावेळी सभापतींनाशासनांकडून आलेले शासन निर्णय, परिपत्रके, आदेश, महत्वाचे पत्रे इत्यादीची माहिती खातेप्रमुखांनी  दिली.

या सभेस उपाध्यक्ष सुभाष पवार , बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे , कृषि पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती उज्वला गुळवी ,महिला व बालकल्याण समिती सभापती दर्शना ठाकरे , समाजकल्याण समिती सभापती निखिल बरोरा , मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार , अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील , उप मुख्य कार्यकारी (सामान्य ) तथा स्थायी समिती सचिव चंद्रकांत पवार उपस्थित होते.

यावेळी  ग्रामिण तिर्थक्ष , यात्रा स्थळ योजना  पाच  पंचायत समितींच्या घसारा निधीतुन नविन वाहन खरेदी , मौजे- मुगांव,ता.शहापुर येथेसिमेंट काँक्रीट बंधारा बांधणे  मौजेनाळींबी ता.कल्याण येथे पाझार तलाव नुतनीकरण करणे , मौजे- कासगांव येथील पाझर तलावनुतनीकरण करणे कामाची ऑनलाईन खुली जाहीर ई- निविदा मंजुरी मिळणे आदी विषयांवर सभागृहात चर्चा करण्यात आली.  या सभेला ठाणे जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख देखिल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.