जिल्हा परिषदेच्या आवारात प्रदर्शन – विक्री

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी बनविल्या घरगुती वस्तू

जिल्हा परिषदेच्या आवारात प्रदर्शन – विक्री

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ठाणे जिल्हा परिषदेच्या  आवारात विविध गृहोपयोगी वस्तूंचा बाजार भरवण्यात आला असून या बाजाराला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी आज भेट दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग चंद्रकांत पवार सहाय्य्क प्रकल्प संचालक अविनाश हरणे , संचालक आरसेटी उल्हास परब आणि प्रशिक्षक  अलका देवरे उपस्थित होत्या.

 

या बाजारात प्रशिक्षणार्थींनी बनविलेल्या घरगुतीपद्धतीच्या फराळ , अगरबत्ती , दिवे तसेच दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूं या बाजारात उपलब्ध आहेत. ही संस्था ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व १८ ते ४५ वयोगटातीलबेरोजगार तरुण तरुणींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना उदयोग करण्यासाठी प्रवृत्त करत असते

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email