जिल्हा परिषद,नगरपंचायतीच्या निवडणुकीत श्रमजीवी संघटनेचा भाजपला जाहीर पाठींबा

( म विजय )

गरीबांच्या प्रश्नांवर सकारात्मक उपाययोजनांसाठी भाजप ला पाठिंबा – श्रमजीवी संघटनेची भूमिका

जिल्हा परिषद,नगरपंचायतीच्या निवडणुकीत श्रमजीवीच्या पाठिंब्यामुळे भाजपचे पारडे जड – कपिल पाटील

ठाणे जिल्हापरिषद आणि नगरपंचायती निवडणूक जाहीर झाल्यापासून गेले अनेक दिवस श्रमजीवी संघटनेच्या पाठींब्याबद्दल सर्वत्र उत्सुकता होती. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात निर्णायक मतं असलेल्या श्रमजीवी संघटनेची ताकद कुणासोबत असेल यावर बरीच समीकरणं अवलंबून होती. आज अखेर पाठींब्याबाबत निर्णय जाहीर झाला. ठाणे जिल्हा परिषद आणि होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये श्रमजीवी संघटनेने भाजप सोबत जाण्याचा निर्णय आज गंगाराम पाडा येथील श्रमजीवी अशोक सापटे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. श्रमजीवीचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी या पाठींब्याची घोषणा केली. यावेळी श्रमजीवीच्या उपाध्यक्षा आराध्या पंडित देखील सोबत होत्या.

 

श्रमजीवी संघटना हाताळत असेलेल्या आदिवासींच्या वन हक्काचा प्रश्न, रोजगाराचा, कुपोषणाचा आणि एकूणच आदिवासींच्या हाताशी निगडित असलेल्या महत्वाच्या प्रश्नाबात संघटनेच्या प्रत्येक आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला. या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी वारंवार आपल्या स्तरावर बैठका घेऊन प्रशासनाला तसे निर्देश ही त्यांनी दिले. येत्या काळात या सर्व प्रश्नाबाबत कालबद्ध कार्यक्रम ठरवून एक सकारात्मक धोरण जाहीर केले जाईल असे आश्वासन फडणविस यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांनी दिल्याने हा पाठींब्याचा निर्णय आम्ही घेतला असे यावेळी आराध्या पंडित यांनी सांगितले.

 

ठाणे जिल्ह्या परिषदेत बहुतांश मतदारसंघात श्रमजीवी संघटनेची मतं निर्णायक आहेत, या श्रमजीवी – भाजप युती मुळे जिल्हापरिषदेच्या विजयाचा भाजपचा मार्ग आता मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्ते आणि सभासदांनी भाजपच्या प्रचारासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करून सकारात्मक निकालात आपले महत्वाचे योगदान दिले होते, संघटनेचा, विवेक भाऊंचा आणि विद्युलता ताईंचा आदेश निघाला की मनापासून काम करणाऱ्या या कार्यकर्ते आणि सभासदांची ही फौज यावेळी देखील विजयश्री खेचून आणण्यात यश मिळविण्यात आपले योगदान देईल याबाबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे असे यावेळी भिवंडी लोकसभेचे खासदार आणि भाजपचे विभागीय अध्यक्ष कपिल पाटील यांनी सांगितले.
या पाठींब्याबाबत विवेक भाऊ पंडित यांचे कपिल पाटील यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

यावेळी श्रमजीवी संघटनेचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, तसेच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, उपाध्यक्ष आराध्या पंडित, जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर, जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, उपाध्यक्ष अशोक सापटे, प्रमोद पवार,राजेश चन्ने,दशरथ भालके, जया पारधी, संगीता भोमटे इत्यादी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email