जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविले
ठाणे दि.२७ – क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे दर वर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असुन यामध्ये जिल्ह्यातील सर्वोत्क्रुष्ट कार्य करणा-या गुणवंत खेळाडु, उत्कृष्ट क्रीडा संघटक/कार्यकर्ता, उत्क्रुष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
२०१७-१८ या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या खेळाडु, क्रीडा संघटक / कार्यकर्ता, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक यांचे विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक १० ऑगस्टपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथून प्राप्त करून अर्जदाराने आपल्या कामगीरीचा तपशील देउन विहीत नमुन्यात अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोर्टनाका, ठाणे ३० ऑगस्टपुर्वी स्वयंसाक्षांकीत प्रमाणपत्रांसह सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी , ठाणे यांनी केले.
Please follow and like us: