जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क ठाणे जिल्ह्यात दुपारपर्यंत सुमारे ३९ टक्के मतदान;

(श्रीराम कांदु)

महिला मतदारांची संख्याही लक्षणीय जोरदार पावसातही मतदारांचा उत्साह

ठाणे दि 25: कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून ठाणे जिल्ह्यात मतदानास सुरुवात झाली. पावसाचा वाढता जोर असूनही तरुण पदवीधरच नव्हे तर ज्येष्ठांनी देखील उत्साहाने मतदान केले असे चित्र दिसले. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर आणि त्यांच्या पत्नी कलाराणी कल्याणकर यांनी देखील दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ३८.५७ टक्के मतदान झाले असे निवडणूक विभागाने सांगितले. विशेष म्हणजे मतदानात महिलांची संख्या लक्षणीय आढळली.

जिल्ह्यात सकाळी ११ पर्यंत २२ टक्क्यांच्या पुढे मतदान झाले होते. ९ हजार ७७५ मतदारांनी मतदान केले होते. दुपारी १ पर्यंत ११ हजार २७४ पुरुष आणि ६ हजार ४०६ स्त्री मतदार अशा १७ हजार ६८० मतदारांनी मतदान केले.

निवडणूक निरीक्षक आर आर जाधव यांनी देखील आज काही मतदान केंद्रांवर भेट देऊन व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी त्यांच्यासमवेत होते

मतदारांची गैरसोय टळली

दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील मतदान केंद्राकडे जाणारा रस्ता जोरदार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने जेसीबीच्या सहायाने तहसीलदार अधिक पाटील यांनी खडी टाकून तात्पुरता रस्ता तयार केल्याने मतदारांना जाणे येणे सोपे झाले.

मुरबाड, शहापूर, सारख्या ठाण्यापासून दूरवरील तालुक्यातील मतदार देखील सकाळपासून मतदानासाठी बाहेर पडले होते . भिवंडीतील तिन्ही मतदार केंद्रांवर १ वाजेपर्यंत ३६.६६ टक्के मतदान झाले होते. कल्याणमधील ६ मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत ३७.९७ टक्के मतदान झाले. मुरबाड मध्ये हेच मतदान सुमारे ४२ टक्के झाले होते. उल्हासनगर मधील तिन्ही मतदान केंद्रांवर देखील ४० टक्यांच्या आसपास मतदान झाले होते. अंबरनाथ मध्ये देखील ४० ते 42 टक्के मतदान झाले. भाईंदर, तुर्भे येथेही मतदारांनी उत्साह दाखविला.

 

ठाण्यात 45 हजार 834 मतदार

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ठाणे जिल्हयातील ठाणे तालुक्यामध्ये एकूण 26 हजार 567 इतके मतदार, कल्याण तालुक्यामध्ये एकूण 6676 इतके मतदार, भिवंडी तालुक्यामध्ये एकूण 3306 इतके मतदार, शहापूर तालुक्यामध्ये एकूण 2340 इतके मतदार, मुरबाड तालुक्यामध्ये एकूण 1469 इतके मतदार,उल्हासनगर तालुक्यामध्ये एकूण 1979 इतके मतदार, अंबरनाथ तालुक्यामध्ये एकूण 3497 इतकेमतदार असे एकूण 45834 इतके मतदार आहेत.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email