जावयाची सासऱ्याला मारहाण – डोंबिवलीतील घटना

डोंबिवली दि.१३ – क्षुल्लक कारणावरून जावयाने सासऱ्याला मारहाण करत त्यांच्या पोटावर काचेच्या तुकड्याने मारल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी अतुल फणसे या जावया विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा नगर परिसरात राहणारे नागेश पाथरे शनिवारी घरी असतांना त्यांचा जावई अतुल फणसे घरात आला. दुपारच्या सुमारास अतुलला त्यांनी लाकडी खाटेवरून बाजूला सरकण्यास सांगितले.

त्यामुळे संतापलेल्या अतुल ने घराबाहेर जावून पाथरे यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाथरे यांनी शिव्या का देतोस असा जाब विचारला असता अतुल ने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात करत काचेच्या तुकड्याने त्याच्या पोटावर मारले. या हल्ल्यात पाथरे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अतुल फनसे विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email