जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी पाच जणांना अटक

नगर – जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी कैलास माने, प्रकाश विलास माने, दत्ता रंगनाथ गायकवाड, बापू रामचंद्र काळे, सचिन गोरख जाधव यांना गुन्हा ७५/२०१८ क.३०२, १२०ब, १४७, १४८, १४९ भादवि व आर्म ऍक्ट ३(२५)(२७) प्रमाणे अटक केली आहे.बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता यांच्या हत्येच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. तसेच आरोपींना अटक न केल्यास मंगळवारी म्हणजे सलग तिसऱ्या दिवशी जामखेड बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र सोमवारी रात्री उशिरा या प्रकरणात अटक करण्यात आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email