जागतिक महिला दिनानिमित्त मनसेच्यावतीने विविध कार्यक्रम

डोंबिवली – जागतिक महिला दिन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या बुधवारी सकाळी ९ वाजता महिला भजन स्पर्धा , गुरुवारी सकाळी १० वाजता  एस. आर. व्हि.ममता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या महिला आरोग्य शिबीरात डॉ. जयश्री बंकारा यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत. `ब्रेस्ट कॅन्सर` विषयावर या शिबिरात  मार्गदर्शन देणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शालिनी ठाकरे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील विशेष कर्तुत्ववान महिलांचा सत्कार आणि बक्षीस समारंभ होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.