जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज ठरणार अंबरनाथ  शहरातील क्रीडा युगाची नांदी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

(श्रीराम कांदु )

जागतिक दर्जाच्या शूटिंग रेंजचे पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले भूमिपूजन 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा 

शूटिंग रेंज सोबत अन्य क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी सात एकरचे भव्य क्रीडा संकुल

 

ठाणे, दि. ०८ : अंबरनाथ शहर ऑलिंपिक दर्जाचे नेमबाज घडवण्यासाठी सज्ज झाले असून या ठिकाणी उभे राहणारे जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज हे अंबरनाथ  शहरातील क्रीडा युगाची नांदी ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. या शूटिंग रेंजसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे त्यांनी याप्रसंगी अभिनंदन केले.

अंबरनाथमधील विम्को नाका येथील पडीक जागेवर ठाणे जिल्ह्यातील पहिले जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज उभारण्यात येत असून त्याचे भूमीपूजन पालकमंत्री शिंदे यांच्या शुभहस्ते शुक्रवारी पार पाडले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेजिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेआमदार डॉ. बालाजी किणीकरनगराध्यक्ष सौ.मनीषाताई वाळेकरमुख्याधिकारी देविदास पवारशहरप्रमुख अरविंद वाळेकरउपनगराध्यक्ष अब्दुल शेखयुवासेना उपजिल्हाधिकारी निखिल वाळेकरशहर अभियंता मनिष भामरेअंबरनाथ रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लबचे सुचिता देसाईआनंद देसाईजगदीश किनळेकर उपस्थित होते.

अंबरनाथ शहर कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती करत असून या शूटिंग रेंजमुळे अंबरनाथ शहर क्रीडा क्षेत्रात देखील नावारूपाला येईल,असा विश्वास श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. यासोबतच समोरील सात एकर जागेवर क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून त्याचे देखील भूमिपूजन श्री.शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या क्रीडा संकुलात जॉगिंग करता ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक असणार आहे तसेचफुटबॉलहॉकीक्रिकेट तसेच अन्य खेळांना चालना देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात काही ठिकाणी १० मीटरचेच शुटींग रेंज उपलब्ध आहेत. परंतु मुंबईत फक्त वरळी येथे १० मी.२५ मी. व ५० मी.  या तीन लेनचे शुटींग रेज बांधण्यात आले आहे. जागतिक शुटींग स्पर्धांमध्ये खेळाडूंना भाग घेण्यासाठी २५ व ५० मी. ची रेंज आवश्यकता असते. अंबरनाथबदलापुरउल्हासनगर तसेच लगतच्या ग्रामीण भागातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडूंना २५ व ५० मी. रेंजच्या शुटींग सरावासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागत होता. अनेक खेळाडूंना आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईपर्यंत जाणे शक्य नव्हते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खेळाडूंची अडचण ओळखून कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये अंबरनाथ शहरात जागतिक दर्जाचे शुटींग रेंज व्हावे यासाठी सन २०१५ पासून सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. आज त्याचे फलित म्हणून विम्को नाकाअंबरनाथ पश्चिम येथील नगरपरिषदेच्या सुमारे सवा एकर जागेवर १० मी.२५ मी. व ५० मी. चे ३ लेनमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचे जागतिक दर्जाचे शुटींग रेंज बांधण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email