जागतिक आदिवासी दिनानिमित्त टिटवाळ्यात पदयात्रेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन…
डोंबिवली दि.०९ – कल्याण तालुक्यात १५ हजार आदिवासी समाजाची लोकसंख्या असून शासनाने मात्र एकही आदिवासी नाही असे कुठल्या आधारावर म्हटले आहे असा प्रश्न उपस्थित करत माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनी मांडा-टिटवाळा येथे आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा आणि मोटरसायकल रॅली काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. या पदयात्राच्या निमित्ताने एक प्रकारे शासनाचे आदिवासी समाजाकडे लक्ष जावे असा उद्देश असल्याचे दिसते.
जागतिक आदिवासी दिनी मांडा-टिटवाळा येथील आदिवासी क्रांती समितीच्या वतीने अध्यक्ष तथा माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांच्या पुढाकाराने ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या आवारापासून भव्य पदयात्रा काढण्यात आली. आपली परंपरा आणि वनातील निसर्गासारखी माया आजहि या आदिवासी बांधवांनी जपून ठेवली असून पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या तरुणाईने आदिवासी संस्कृती तसेच विविध साहसी खेळांचे दर्शन यावेळी घडविले.
आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवत वेशभूषा रंग भूषा करून ,विविध पेहराव करून ,पारंपरिक वेशातील आदिवासी बांधव हा रॅलीत सहभागी झाले होते.या रॅलीत पारंपरिक ढोल सनई वाद्यासह आदिवासी बांधवांनी नृत्याचा फेर धरला होता. यावेळी यावेळी पारंपारिक वाद्यांचे पूजनहि करण्यात आले. यावेळी उपस्थित आदिवासी समाजाने शासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी माजी उपमहापौर सरनोबत म्हणाले, शासनाचे कल्याण तालुक्यात आदिवासी समाजाची माहिती घ्यावी. या तालुक्यातील अनेक वस्त्यांमध्ये हा समाज अनेक वर्षापासून वास्तव्य करत असून या समाजाकडे पाठ दाखविण्याचे काय कारण ? आज पदयात्रा आणि मोटरसायकल रॅली काढून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आता तरी या समाजाकडे शासनाने कानाडोळा करू नये अशी मागणी सरनोबत यांनी केली.