जल बचाओ, व्हिडिओ बनाओ, पुरस्कार पाओ स्पर्धा: तिसऱ्या आणि चौथ्या पंधरवड्यातील पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली, दि.०९ – जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाने जल बचाओ, व्हिडिओ बनाओ, पुरस्कार पाओ स्पर्धेच्या तिसऱ्या आणि चौथ्या पंधरवड्यासाठीचे विजेते जाहीर केले आहेत. 9 ते 23 ऑगस्ट 2018 या तिसऱ्या पंधरवड्यासाठी कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील डॉ. एन. जे. देवराज रेड्डी यांना पहिल्या क्रमांकाचा, महाराष्ट्रातील रायगड येथील एकनाथ अंकुश गोपाल यांना दुसरा क्रमांकाचा तर ग्वाल्हेरमधील जितेंद्र भारद्वाज यांना तिसरा क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
24 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2018 या चौथ्या पंधरवड्यासाठी पाटणाच्या प्रिन्स कुमार यांना पहिल्या क्रमांकाचा, गोव्याचे साईनाथ ऊसकैकर यांना दुसऱ्या क्रमांकाचा तर नवी मुंबईच्या संतोष पढी यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. विजेत्यांना प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 15 हजार रुपये तर तृतीय पुरस्कार 10 हजार रुपये दिले जातील.
जलसंवर्धनाबाबत जागृकता निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या मायगव्ह पोर्टलच्या सहकार्याने जलसंपदा मंत्रालयाने जल बचाओ, व्हिडिओ बनाओ, पुरस्कार पाओ स्पर्धा सुरू केली. कुणीही भारतीय नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. या संकल्पनेवर त्यांनी ना मूळ व्हिडिओ चित्रीत करणे आवश्यक आहे. ही स्पर्धा 4 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.