जलकुंभाला २४ तास गळती; लाखो लीटर पाण्याची नासाडी

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – अपुरा जलसाठा असल्याने यंदा हिवाळ्यातच पाणी कपातीला सुरुवात झाली आहे पालिका प्रशासन पाणी जपून वापरा असा उपदेश करत असताना  महानगरपलिकेच्या गरीबाचा वाडा   जलकुंभाला गळतीलागल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 20 लक्ष लीटर क्षमतेच्या टाकीतून 24 तास  पाणीगळती सुरू असल्याने नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे  सुमारे 70 च्या जवळपास जलकुंभ आहेत.तर काही जलकुंभाचे काम चालु आहे.मात्र   डोंबिवली पश्चीमेतील गरीबाचावाडा जलकुंभाच्या टाकीमधील गळतीमुळे पाणी २४ तास वाहत आहे. अतिशयवेगाने पाणी वाहत असल्याने हा सर्व परिसर जलमय होतो.   त्यामुळे अनेक वेळा येथील लोकांना कमी  दाबाने पाणी पुरवठा होतो. तसेच या वाहत्या पाण्यामुळे टाकी लवकर  रिकामी होत असल्याचे रहिवाशांचे  म्हणणे आहे. आश्चर्याची  गोष्ट म्हणजे केडीएमसीच्या पाणीपुरवठा अधिका-यांना अनेकवेळा याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. तरी देखील या बाबत त्यांना गांभीर  दखल घेतली नाही डोंबिवलीत दर मंगळवारी पाणीपुरवठाबंद ठेवण्यात येतो. त्यामध्ये नागरिकांची विशेषतः महिलावर्गाचे अतोनात हाल होत असताना दुसरीकडे असे लाखो लीटर पाणी दररोज वाया जात   असल्याने नागरीक संताप व्यक्त करीत आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली टाकी जुनी आहे. त्याची अनेक वर्षांपासून डागडुजी केली नसल्याने येथून गळती होते. गळती होणाऱ्या जागेवर सिमेंट लावण्याचा प्रयोग यापूर्वी करण्यात आला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे गळती रोखण्यात अपयश आले, असे कळते . यापुर्वीही अनेक टाक्यांचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे केल्याने जलकुंभ नवीन असतानाच गळती लागण्याचे प्रकार घडले होते. याबाबत महासभेतही अनेकवेळा या प्रश्नावर  वाद झाले होते. मात्र जलकुंभांच्या देखभाल दुरुस्ती बाबत काही ठोस पावले उचलली   गेली नसल्याचे पाहावयास मिळत आहे. या जलकुंभांचे बांधकाम होऊन अनेक वर्ष झाली. मात्र त्याची देखभाल दुरुस्ती ठेवणे हेही   महत्त्वाचे आहे. हे जर काम ज्या  दिवशी   पाणी पुरवठा बंद ठेवला जातो त्या दिवशी दुरुस्ती करावी अशी सूचना नागरिक करत आहेत .
या संदर्भात उपकार्यकारी अभियंता अनिरुद्ध सराफ यांना विचारले असता त्यांनी हा जलकुंभ 20 वर्षे जुना असून त्याची गळती होत असल्याने तज्ञ ठेकेदाराला हे काम देण्यात आले असून दोन महिन्यात दुरुस्ती होईल असे सांगितले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email