जमीनीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा

कल्याण : जमिनी विकत देण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्र तयार करून एका इसमाला तब्बल 30 लाखांना गंडा घातल्याची कल्याणात उजेडात आली या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलीसानी दाखल केला आहे.
कल्याण पूर्वेकडील काटेमानवली चिंचपाडा रोड साई दीप अपार्टमेंट मध्ये राहणारे मयूर मिसरे यांना अंबादास सोनावने याने टीटवाळा मांडा येथील जमीन खरेदीखत करून देण्याचे आमिष दाखवून पावती करून देत मिसर याच्या कडून चेक द्वारे तब्बल 30 लाख लाटले त्यानंतर वेळोवेळी खोटे नाटे कारणे सांगून सदर जागेचा बनावट प्लान तयार करत तो खरं असल्याचे भासवून मिसरे यांना दिला मात्र हा प्लान बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने मिसरे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी अंबादास सोनावने विरोधात कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसनी अंबादास सोनावने विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email