जननी आशिष संस्थेच्या सोशल वर्कर जयश्री देशपांडे यांचे अल्प आजाराने निधन

डोंबिवली दि.१३ – येथील अनाथ मुलाचे संगोपन करणाऱ्या जननी आशिष संस्थेच्या सोशल वर्कर जयश्री रमेश देशपांडे (५१)यांचे काल सकाळी अल्प आजाराने निधन झाले.

२५ वर्षांपूर्वी डोंबिवलीत ‘जननी आशिष ‘संस्था स्थापन झाल्यापासून त्या तेथे कार्यरत होत्या अनाथ मुलांना मायेचे हक्काचे घर मिळावे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले एक महिन्यांपूर्वी त्या न्यूमोनियाने आजारी होत्या.

म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले होते आठ दिवसांपूर्वी छातीत दुखत असल्याने त्यांना ममता रुग्णालयात दाखल केले पण काल सकाळी ७:०० वा त्याचे निधन झाले त्याच्या पासचयात पती रमेश ,मुलगा अनिरुद्ध असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.