जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करा 

( श्रीराम कंदु )

कल्याण शहर काँग्रेसच्या वतीने नोटाबंदीच्या वर्षपूर्ती निमित्ताने  मोहने ब्लॉक प्रभाग क्षेत्र काँग्रेस कमिटी प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली मोहना बाजार पेठ येथुन कँडल मार्च  काढण्यात आला.  यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकत्यांशी चर्चा करताना   केणे यांनी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळवण्यासाठी जनतेच्या समस्या सोडवा . वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करा असा सल्ला उपस्थित पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांना दिला.

  एन आर सी गेट ते आंबेडकर स्मारक पर्यंत मोहना शहरात भाजप सरकारच्या विरोधात मेणबती जन आक्रोश रँली आयोजित केली होती.भाजप सरकार हाय हाय! नोटाबंदी हाय हाय!
अश्या घोषणा रँली दरम्यान देण्यात आल्या. रॅलीनंतर  केणे यांनीपदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी केणे  म्हणाले, आज जरी मोदी लाट असली तरी ती कायम राहणार नाही. आज सर्व  देशात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव गाजत आहे. त्यामुळॆ यापुढे काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण  जाहले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. हे सरकार  आणि शासन जर जनतेचे प्रश्न सोडवण्यास कमी पडत असेल तर आपण या सरकारला जाब विचारू. काँग्रेस पक्षातील कार्यकर्ता हा नेहमी रस्त्यावर उतरून जनतेची मदत करत असतो. पुन्हा जनता आपल्याकडे आशेने पाहत  हे विसरू नका. यावेळी उत्तम राजगुरू,
यादव सानप, सलीम काझी, चंद्रकांत पाटील, दस्तगीर शेख, तौसिफ काझी, फरीद काझी, प्रकाश साबळे, एकनाथ म्हात्रे , अखिल भोईर , वर्षा गुजर ,  राहुल केणे , प्रणव केणे  , जयश्री थीगडे, लताबाई जाधव, भावना शाह,  वनिता साबळे , सीताबाई भोसले , काशीबाई आरेवाकर , दीप्ती दोषी , बेबी परब , इत्यादी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते रँलीला उपस्थित होते.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email