जगभरातल्या विशेषज्ञांनी भारताच्या अपतटीय पवन ऊर्जा लक्ष्याचे कौतुक केले
नवी दिल्ली, दि.०६ – जगातल्या पवन ऊर्जा विशेषज्ञांनी अपतटीय पवन ऊर्जेबाबत भारताने केलेल्या उद्दिष्टाचे कौतुक केले. वर्ष 2030 पर्यंत 30 जीडब्ल्यू अपतटीय पवन ऊर्जेचे उदिृष्ट भारताने ठेवले आहे. दुसऱ्या जागतिक पुनर्गुंतवणूक भारत-आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, भागीदारी, नवीकरणीय ऊर्जा, गुंतवणूकदार बैठकीचे आणि प्रदर्शनाचे आयोजन 3 ऑक्टोबर 2018 रोजी ग्रेटर नोएडा येथे करण्यात आले होते.
राष्ट्रीय पवन ऊर्जा संस्थेने देशातील पहिल्या अपतटीय पवन ऊर्जा योजनेसाठी “अभिरुचीसाठी अभिव्यक्ती” आमंत्रित केली आहे. गुजरातच्या तटापासून लांब खंबातच्या आखातात 1,000 मेगावॅटचा हा प्रकल्प असेल.
Please follow and like us: