छेडछाडीचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणासह काकावर प्राणघातक हल्ला

कल्याण दि.०७ – काळा तलाव परिसरात सकाळी आणि रात्री फिरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. जेष्ठ नागरिकांसह महिला वर्ग सुरक्षित ठिकाण म्हणून या परिसरात फिरण्यासाठी येतात मात्र याच परिसरात काल संध्याकाळी एका तरुणीची छेड काढण्यात आली. या छेड काढणाऱ्या टोळक्याला जाब विचारत विरोध करणाऱ्या अनरजीत सोनार या तरुणासह त्याच्या काकावर देखील प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या घटने नंतर महिला आणि तरुणीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

काळा तलाव परिसरात नावरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे काल संध्याकाळी याच परिसरातून जाणाऱ्या एका तरुणीची काही जणांनी छेड काढली. ही बाब या ठिकाणी असणाऱ्या अनरजित सोनार यांच्या लक्षात आल्याने त्याने छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारला त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी अनरजीत सह त्याच्या काकबरोबर वाद घालत त्या दोघांवर प्राणघातक हल्ला केला. या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात या टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email