चौथी निती आयोग-डीआरसी चर्चा मुंबईत संपन्न
नवी दिल्ली, दि.०२ – निती आयोग आणि चीनच्या राष्ट्रीय परिषदेचे विकास संशोधन केंद्र (डीआरसी) दरम्यान चौथी चर्चा काल मुंबईत संपन्न झाली. डीआरसीचे अध्यक्ष ली. वई यांनी चीनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ चर्चेत सहभागी झाले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै 2015 मध्ये जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषदेत झालेल्या भेटीनंतर भारत आणि चीन दरम्यान ही दुसरी मंत्रिस्तरीय बातचित होती. नीती आयोग-डीआरसी दरम्यान होणारी चर्चा दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या सातत्यपूर्ण वैचारिक चर्चेसाठी चांगला मंच असल्याचे डॉ. राजीव कुमार यांनी अधोरेखित केले.
Please follow and like us: