चोरी गेलेला नऊ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत

(म.विजय)

बीड – विविध गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेला नऊ लाख रूपयांचा किंमती मुद्देमाल पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयात काल पार पडला.

बीड तालुक्यातील राजुरी येथील एटीएएम मशीन लंपास करताना पाच दरोडेखोरांना बीड पोलिसांनी पकडले होते. त्यांचा हा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला होता. या एटीएममध्ये तब्बल ७ लाख १५ हजार रूपयांची रक्कम होती. ही रक्कम सुरक्षित ठेवून काल सन्मानपूर्वक बँकेचे व्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यासह दोन दरोडे, एक जबरी चोरी, ३ घरफोडी व १ चोरीतील ९ लाख २ हजार ६१० रूपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) भास्कर सावंत, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे, बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दिलीप तेजनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बँकेकडून पोलिसांचा सत्कार :

सात लाख रूपयांची रक्कम सन्मानपूर्वक परत केल्यामुळे एसबीआय बँकेच्यावतीने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यासह तपास करण्यात परिश्रम घेतलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला.

यापुढे आपण पोलिसांना कोणत्याही कामात सहकार्य करू, असे अश्वासनही बँकेच्यावतीने आभार व्यक्त करताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email