चोरीच्या रेतीची बेकायदेशीर वाहतूक करणारे ट्रक चालक व क्लिनर गजाआड
कल्याण –गुजरात येथून विनावरवना रेती आणून या रेतीची बेकायदेशीर पणे वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकासह क्लिनर ला बाजार पेठ पोलिसानी अटक केली असून ट्रक व रेतीचा साठा जप्त केला आहे .सहजाद शेख असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव असून राम उदागर मुखींया असे क्लिनर चे नाव आहे . बाजार पेठ पोलीस स्थानकाचे पथक काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आधारवाडी सर्कल ते खडकपाडा सर्कल दरम्यान गस्त घालत असताना त्यांनि या रस्त्यावरून जाणाऱ्या एक ट्रक ला हटकले व ट्रक मधील रेतीची कागदपत्रे मागितली तेव्हा ही गुजरात हुन बेकयादेशीररीत्या विना रॉयल्टी ही रेती आणन्यात आल्याचे निष्पन्न झाले .त्यामुले पोलिसानी ट्रक चालक सहजाद शेख ,क्लिनर राम उदागर मुखींया या दोघांना अटक करत सदर ट्रक व रेतीने भरलेल्या ५०० गोण्या जप्त केल्या आहेत .
Please follow and like us: