चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत दीडशे मुलांचा उस्फूर्त सहभाग,ठा.म.पा.आयुक्तही रमले मुलांमध्ये

आयुक्त रमले इंदिरानगर झोपडपट्टीतील मुलांमध्ये चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत दीडशे मुलांचा उस्फूर्त सहभाग

ठाणे- हाताच्या बाह्या सावरत, चेह-यावरील गरीबीचे मळभ दूर फेकून आज इंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत उस्फूर्त सहभाग घेवून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत आपली रविवारची सुट्टी साजरी केली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वालही सर्व अभिनिवेश विसरून या मुलांमध्ये रममाण झाले. निमित्त होते इंदिरानगर झोपडपट्टीची रंगरंगोटीचे.
गेल्या आठवड्यापासून ठाणे शहरातील इंदिरानगर आणि डोंगरीपाडा येथील झोपडपट्टीमध्ये आकर्षक रंगरंगोटीसह नागरिकांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण याविषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेला स्थानिक रहिवाशांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर आज इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये मिसाल मुंबई या संस्थेच्या माध्यामतून या परिसरातील मुलांसाठी चित्रकला कार्यशाळा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास दीडशे मुलांनी सहभाग नोंदविला. यातील उत्कृष्ट चित्रांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे जयस्वाल यांनी खेळकर वृत्तीने या मुलांशी संवाद साधला. त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्याशी गप्पा मारल्या. यावेळी नगरसेविका सौ. केवलादेवी रामनयन यादव, माजी नगरसेवक राजकुमार यादव, महापालिकेचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email