चाळीत रूम बांधून देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा

कल्याण – कल्याण नजीक असलेल्या टिटवाळा येथे असलेल्या एका जमिनीवर चाळीत घरे बांधून देतो असे आमिष दाखवत तब्बल 27 लाख 49 हजारांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात अली असून या तक्रारी नुसार पोलिसानी प्रवीण केदार या भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जोशी बिल्डिंग मध्ये प्रवीण केदारे यांचे ओम बिल्डर्स एन्ड डेव्हलपर्स चे कार्यलय आहे .एप्रिल 2013 साली केदारे यांनी मुंबई विक्रोळी येथे राहणारे  पांडुरंग मायगडे यांना व त्यांच्या मित्राला टिटवाळा येथे चाळींमध्ये रूम बांधून देतो असे आमिष दाखवत या दोघांकडून मिळून  तब्बल 32 लाख 50 हजार रुपये घेतले .मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटूनही घर बांधून न दिल्याने त्यांनी केदारे यांच्याकडे पैसे परत मागितले .केदारे यांनी त्यांना 5 लाख रुपये देत उर्वरित 27 लाख 49 लाख रुपये देतो असे सांगत सत्यप्रतिज्ञा पत्र लिहून दिले मात्र बराच कालावधी उलटूनही पैसे परत न केल्याने  मायगडे याना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारि नुसार पोलिसानी प्रवीण केदारे विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email