चालत्या रोड रोलरला अचानक आग ;मोठी दुर्घटना टळली
भिवंडी-भिवंडी येथील वंजारपट्टी विभागातील पेट्रोल पंपाच्या समोरुन जाणा-या एका रोड रोलरला सकाळी अचानक आग लागली.ही आग एव्हढी भयंकर होती की या आगीत या रोड रोलरचे पूर्णपणे नुकसान झाले.सदर ठिकाणावरुन पेट्रोल पंप काही पावलांच्या अंतरावरच असल्याने मोठी दुर्घटना टळली. सदर वृत्त समजताच अग्निशामक दल तात्काळ तेथे रवाना झाले व त्यानी आग आटोक्यात आणली.याप्रकरणी निजामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Please follow and like us: