चार वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा युवकाचा प्रयत्न

केज – तालुक्यातील दहीफळ येथे शेतात एका चार वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका युवकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने सदरील युवकाने पळ काढला. परंतु, नातेवाईकांनी पाठलाग करून सदरील युवकास पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. रात्री उशीरा मुलीच्या आई-वडीलांनी केज पोलीस ठाण्यात युवकाविरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी आणि मुलीला रात्री उशिरा वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून वैद्यकीय अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email