चार महिन्यांपासून आपल्या मुलाला पाळणाघरात सोपवुन गेलेल्या मातेचा काहीच ठावठिकाणा मिळत नसल्याने पोलिसात तक्रार
डोंबिवली-चार महिन्यांपासून आपल्या मुलाला पाळणाघरात सोपवुन गेलेल्या मातेचा काहीच ठावठिकाणा मिळत नसल्याने याप्रकरणी मानपाड़ा पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
या बद्दल सविस्तर वृत्त असे की डोंबिवली येथील निळजे गावातील रहिवासी किरण प्रकाश शेट्टी यांच पाळणाघर आहे.जिथे आपल्या मुलांना सोडून पालक कमला जातात. याच विभागातील जानवी नामक महिला येथे आपल्या ५ वर्षीय मुलगा मयूर याला सोडून जायची व सायंकाळी परत न्यायची.परंतु ऑगस्ट २०१७ पासुन जानवीने मयुराला घरीच नेले नाही.जानवीचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता.डिसेंबरमध्ये शेट्टी व जानवी यांची अचानक भेट झाली.तिच्याकडे शेट्टी यांनी विचारणा केली असता जानवीने “मी मुलाचं पालनपोषण करू शकत नाही म्हणून मी त्याला नेणार नाही.”असे उत्तर दिले व तेथून निघून गेली.या प्रकरणी म.न.पा. उपमहापौर मोरेश्वर भोईर यांना समजताच त्यांनी शेट्टी यांची भेट घेतली व त्यांना सहकार्यचं आश्वासन दिलं आणि शेट्टी यांच्या बरोबर जाऊन पोलिसात तक्रार नोंदवली. मानपाड़ा पोलिसांनी सदर प्रकरणी तक्रार नोंदवून लवकरच कारवाई करू अस आश्वासन व.पो. निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिले.