चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस पेटविले; पतीवर गुन्हा
माजलगाव – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे उघडकीस आली आहे. शेख शाईनाबी शेख फेरोज (वय ३५) असे जळीत महिलेचे नाव आहे. तिचा पती शेख फेरोज शेख युसुफ याने दुपारी ४ वाजताच्या सुमारास राहत्या घरी असताना चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ केली.
त्यानंतर रॉकेलच्या कॅण्डवर लाथा मारून रॉकेल शेख शाईनाबी यांच्या अंगावर पाडले आणि काडी पेटवून त्यांच्या अंगावर फेकली. त्यामुळे शेख शाईनाबी यांच्या साडीने पेट घेतला आणि त्या गंभीररित्या भाजल्या. याप्रकरणी शेख शाईनाबी यांच्या तक्रारीवरून पती शेख फेरोज याच्यावर कलम ३०७, ५०४ अन्वये माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
Please follow and like us: