कल्याण – कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात रहदारीच्या रस्त्याच्या एखाद्या चौकात कडेला कोपरा गाठत उघड्यावर खाद्य पदार्थ विक्री करणारे वाढत असून अतिशय घाणेरड्या पद्धतीने हे बनवत असून उघडयावर सिलेंडर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत तसेच आरोग्याला धोका निर्माण झाला आहे .अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विरोधात पोलिसानी कायदेशीत कारवाई सुरू केलि आहे .कल्याण पश्चिमेकडील वल्लीपिर रोड येथे जगन्नाथ देवनाथ याची चायनीज खाद्य पदार्थची गाडी आहे या ठिकाणी जीवितास धोका निर्माण होईल नुकसान होईल ,अशा पद्धतीने ज्वालाग्राही शेगडीवर खाद्यपदार्थ तयार करून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपायोजना न केल्यचे निदर्शनास आल्याने पोलिसानी या प्रकरणी जगन्नाथ देवनाथ विरोधात गुन्हा दाखल केला आहे .